प्रदक्षिणा राजमाता जिजाऊ माँसाहेबाच्या चरणी नतमस्तक होण्याची
प्रदक्षिणा छ़त्रपती शिवरायांना मानाच्या मुजर्याची
प्रदक्षिणा शूर मावळ्यांच्या पराक्रमाना उजाळा देणारी
प्रदक्षिणा अनेक संकटाना मात देऊन आत्मविश्वास निर्माण करणारी मनोबल उंचावणारी
जसे आपल्या मनात विविध देवदेवतांच्या मंदिराबाबत श्रध्देचा भाव असतो तोच भाव त्यापेक्षा काकणभर सरस शिवछत्रपतींच्या गड किल्ल्याच्या बाबतीतअसतो त्यामुळे आपण तिथे नेहमी नतमस्तक होण्यासाठी जात असतो
जस आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतो त्याच भावनेतून गड किल्ले यांना पदक्षिणा घालायची सुरूवात बहूतेक झाली असावी
महाराष्ट्रात आज अनेक संस्था अश्या प्रदक्षिणांचे आयोजन करतात
हेतू कदाचित वेगवेगळेही असू शकतात पण अश्याआयोजनाना प्रतिसादही चांगला मिळतो ह्यात सहभागी होणार्यांची सुरक्षतेबाबत घ्यावयाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आणि असायलाच हवी त्याबाबत तडजोड होता कामा नये अपवादात्मक,भौगोलिक,त्रृटी वगळता नियोजनही निटनेटके केले जाते
आपल्या महाडमधील यूथ क्लब महाड हि संस्था गेली 29 वर्षे रायगड प्रदक्षिणचे राज्यस्तरीय आयोजन करीत आहे हि आपल्या महाडकरांसाठी अभिमानाची बाब आहे
त्यामुळे प्रथम ह्या क्लबचे विद्यमान अध्यक्ष श्री संतोषजी सकपाळ व त्यांच्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद
गेली अनेक वर्षे मनात ह्या प्रदिक्षणेत भाग घेण्याची जबरदस्त इच्छा तितकीच भिती मनात होती पण यंदा माझा जवळचा मित्र अमोद कळमकर व त्यासोबत प्रदिक्षणेला जाणार्या सर्वसवंगड्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे मनोबल उंचावले व मी सहभाग ही नोंदविला व प्रदक्षिणा पूर्ण ही केली त्यामुळे सर्व सवंगड्यांचे खूप खूप आभार
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय
शिवभक्त --श्री अमित उदय फुटाणकर